श्रीमद्भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे भवरोगाने ग्रस्त झालेल्या जीवाला अनंत दिव्यजीवन प्रदान करणारे दिव्य अमृतच आहे. अशा या दिव्यामृतस्वरूप गीतोपदेशाला आपल्या चिंतनाचा विषय बनवून त्या समस्त गीतोपदेशरुपी सुधेचे सारच श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी श्रीमद्भगवद्गीतासुधासार ह्या ग्रंथातून सांगितले आहे. पहिल्या अध्याया पासून उपदेशात्मक विचारांचा ओघ आणि त्यांची दिशा कशी वाहत जाते आणि अठराव्या अध्यायात ते उपदेशात्मक विचार कसे पूर्णत्वास जातात याचे अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत, काही ठिकाणी प्रासंगिक उदाहरणे देऊन विवेचन केलेले आहे.

अधिक वाचा