|| श्रीविद्या अखंडमहायोग ||

श्रीविद्याअखंडमहायोग ही अध्यात्म मार्गातील अति प्राचीन अशी योग परंपरा आहे. हठ्योगापासून ते मंत्रयोगापर्यंत व इतरही सर्व साधनांना एकात्मिक व समन्वित स्वरुपात प्रगट करते. युगा-युगा पासून चालत आलेली ही दिव्य बोध परंपरा सांप्रत काळी श्री सद्गुरुदेव श्रीनिवासजी काटकर पुढे नेत आहेत.

दिव्य श्री माता, ती आपल्या मुलांवर विनाअट प्रेम करते.
तिचे दैवी बिनशर्त प्रेम अनुभवण्यासाठी आपण, तिच्या मुलांनी, पूर्ण अहंकाररहित शरणागतीने तिच्यावर बिनशर्त प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- श्रीगुरुदेव

श्री गुरुदेव

प्रा. श्रीनिवास शामराव काटकर, त्यांच्या प्रशंसक, भक्त आणि शिष्य यांच्यात श्रद्धेने श्रीगुरुदेव म्हणून ओळखले जातात, ते एक महायोगी आणि एक महान तत्वज्ञ आहेत. आध्यात्मिक गुरु म्हणून ते श्रीविद्यामहायोगाच्या व्यावहारिक शास्त्रामध्ये पात्र, अध्यात्मिक साधकांचा वर्ग, जात, भाषा आणि लिंग विचारात न घेता मार्गदर्शन करीत आहेत. श्री गुरुदेव हे दिव्य आध्यात्मिक प्रेरणा आणि खर्‍या आधुनिक युगातील शाश्वत स्त्रोत आहेत.

श्रीविद्याअखंडमहायोग

सच्चिदानंदस्वरूप परमार्थतत्वाचा सर्वोच्च ,परिपूर्ण साक्षात्कार प्राप्त व्हावा अशा तीव्र अभिप्सेने युक्त असलेल्या जिज्ञासू साधकांसाठी भगवान परमशिव श्रीदक्षिणामूर्तिंनी “श्रीविद्याअखंडमहायोग” ही साधनापद्धती सर्वप्रथम प्रचारात आणली.

आमच्या सद्गुरूनाथांच्या रूपाने आविष्कृत झालेले सच्चीदानंदाचे अनंत प्रज्ञान आणि अनंत निष्कामप्रेम हेच आमच्या जीवनाचे एकमेव प्रेरक व्हावेत हि प्रार्थना, औम.

श्री गुरुदेव

गुरु पौर्णिमा - 2024

आगामी कार्यक्रम

ध्यान केंद्र - दर रविवारी

श्रीविद्याअखंडमहायोग अभ्यास केंद्र, जुळे सोलापूर येथे प्रत्येक रविवारी, सकाळी 9.00 ते 11.00 दरम्यान ध्यान केंद्र चालू असेल. ज्यांना ध्यान, जप, मनन, अभ्यास करायचा आहे त्यांनी रविवारी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत श्रीविद्याअखंडमहायोग अभ्यास केंद्र जुळे सोलापूर येथे उपस्थित राहावे. तसेच, या गुरुपौर्णिमेचे फोटो अल्बम पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

पुस्तके

Rahasyarthaprakash – Mahabhashya (Part 1)

त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 1

त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.

अधिक वाचा
Dashangamahabhaktiyoga

दशांगमहाभक्तियोग

दशांगमहाभक्तियोग प्रकाशन तारीख 2018-07-27 भाषा मराठी एकूण पाने 168 भक्तिसाधनेच्या विविध अंगावर प्रकाश टाकणारा श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांचा 'दशांगमहाभक्तियोग' हा ग्रंथ आहे. निष्ठा, आचार, सेवा, चरित्र, ध्यान, राग, अनुराग, अतिराग, औदासिन्य आणि प्रेमहर्ष या भक्तिच्या दहा विविध अंगाचे महत्त्व प्रस्तुत ग्रंथाद्वारे श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी प्रकट केले आहे. श्री ज्ञानदेवांच्या श्रीहरिपाठ या रचनेमध्ये त्यांनी 'दशकांचा मेळा' या शब्दांद्वारे दशांगमहाभक्तिचा केवळ सूतोवाच केला. त्या सूतोवाचावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भक्तिच्या दहा अंगांचा सविस्तर आणि सखोल उलगडा 'दशांगमहाभक्तियोग' या महाग्रंथामधून केला आहे.

अधिक वाचा
Shri Ganesharchana Deepika

श्रीगणेशार्चनदीपिका

श्रीमहागणपती सहस्त्रनामातील एकशे आठ नामांचा केवळ शब्दार्थच नव्हे तर त्यांच्या मागील गूढ रहस्यार्थ प्रकट करणारा असा श्रीगुरुदेव श्रीनिवासजी रचित श्रीगणेशार्चनदीपिका हा ग्रंथ आहे. आपल्या उपास्य देवतेच्या नामांच्या अर्थाचे अनुसंधान करणे हा त्या देवतेच्या उपासनेचे एक महत्त्वाचे अंग आहे. नामार्थाचे अनुसंधान हा जसा स्वाध्याय आहे तसेच आपल्या उपास्यरूप परमेश्वराचे प्रणिधान म्हणजे ध्यानही आहे. दिव्य, चिन्मय सगुण साकार स्वरुपात अवतरलेल्या परमेश्वराच्या प्रत्येक विग्रहांची पाच वैभवशाली अथवा ऐश्वर्यशाली अंगे असतात. उपास्य देवतेचे नाम, रूप, गुण, लीला आणि धाम हीच ती प्रत्येक देवतेची पाच ऐश्वर्यशाली अंगे होत की ज्यांना उपासना शास्त्रामध्ये 'पंचविभव' अशी संज्ञा आहे. प्रत्येक उपासकांनी आपल्या उपास्य देवतेचे प्रणिधान अथवा ध्यान करताना तिच्या वर उल्लेखिलेल्या पंचविभवांवर आपले चित्त केंद्रीत करावयाचे असते. नेमके हेच श्री गुरुदेवांनी या ग्रंथामधून सविस्तररित्या स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा

खरा आनंद - आध्यात्मिक आकांक्षाचे ध्येय

या जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी रहाण्याची इच्छा आहे. आनंदाचा पाठपुरावा हा एक सामान्य धागा आहे जो सर्व लोकांना जोडतो. तरीही, आनंदाचा अर्थ आपल्याला खरोखर समजला आहे का? आनंदी व्यक्तीची वैशिष्ट्ये कोणती? एच. एच. श्री गुरुदेव श्रीनिवासजी आनंदाचा खरा अर्थ आणि अध्यात्मिक इच्छुकांसमवेत या भव्य संवादातून आध्यात्मिक साधकाचे खरे ध्येय स्पष्ट करतात म्हणून हा लेख जाणून घ्या.

वैदिक हिंदू धर्म

वैदिक हिंदू धर्माची मूलभूत तत्वे कोणती आहेत? देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे? हिंदू धर्मांबद्दल एच. एच. श्री. गुरुदेव श्रीनिवासजी यांनी तरुण अमेरिकेशी केलेल्या चर्चेतून वैदिक हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे आणि इतर धर्मांतील भिन्नता याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे ते जाणून घ्या.

श्रीविद्येचा अर्थ

श्रीविद्या किंवा श्रीरूपिणी विद्या ही जीवनातील सर्वोच इष्ट गोष्ट आहे. तर, श्रीविद्याचा अर्थ किंवा मूळ सार काय आहे?

श्री गुरुदेव श्रीनिवासजींकडून श्रीविद्या किंवा परमज्ञानाचे खरे स्वरुप समजावून घ्या.