पुस्तके

Shree Matruprasad

श्रीमातृप्रसाद

सर्वसामान्य हिंदू जीवन- पध्दतीला अनुसरुन जीवन जगणाऱ्या व्यक्तींना विशेषतः स्त्रियांना गूढ सैध्दांतिक विषयांच्या वैचारीक ऊहापोहाबरोबरच आपले रुढ धार्मिक जीवन प्रत्यक्षात कसे जगावे, याचीही जिज्ञासा असते. घरात नित्य देवपूजा का व कशी करावी इथपासून आपले कुलधर्मकुलाचार का व कसे पाळावे, आपल्या हिंदू धर्मांतर्गत विविध सण उत्सव यांचे नेमके महत्व काय आहे, विविध तीर्थक्षेत्रे, तेथील मंदिरे येथे उपस्थित झाल्यानंतर तेथे आपले वर्तन कसे असावे इथपर्यंत अनेक विषयासंबंधी प्रश्न हिंदू परंपरेनुसार धार्मिक जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य स्त्री-पुरुषांच्या मनामध्ये येत असतात.त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पूज्य गुरुमाता सौ. सुलक्षणादेवी श्रीनिवास काटकर यांनी मातृप्रसाद या ग्रंथामधून दिली आहेत.

अधिक वाचा
Rahasyarthaprakash – Mahabhashya (Part 4)

त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 4

त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.

अधिक वाचा
Bhagwan Shree Mahakalbhairav Rahasyaprakash – Volume 2

भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश - 1

'भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश' या ग्रंथाच्या दुसऱ्या भागाला 'महात्म्येतिहासखंड' असे नांव दिलेले आहे. प्राकऐतिहासिक कालापासून ते विद्यमान ऐतिहासिक कालापर्यंत भगवान श्रीमहाकालभैरवोपासनेचा प्रवाह कसकसा प्रवाहित होत राहिलेला आहे याचे विवेचन पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी ग्रंथाच्या या द्वितीय भागामध्ये केलेले आहे.

अधिक वाचा
Bhagwan Shree Mahakalbhairav Rahasyaprakash – Volume 1

भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश - 1

भगवानश्रीमहाकालभैरवरहस्यप्रकाश 1 - या पहिल्या भागामध्ये 'ज्ञानखंड' आणि 'चर्याखंड' अथवा 'उपासनाखंड' अशा दोन उपविभागांमधून पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी शामराव काटकर यांनी भगवान श्रीमहाकालभैरव देवतेसंबंधी रहस्यमय माहिती प्रकट केलेली आहे. ग्रंथाच्या या पहिल्या भागातील ज्ञानखंडामध्ये पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भगवान श्रीमहाकालभैरवांच्या प्रमुख अशा साठ नावांचा गुह्यार्थ स्पष्ट करणारे विवरण लिहिले असून ते विवरण गूढार्थबोधिनीटीकेच्या स्वरूपात या प्राथमिक ज्ञानखंडामध्ये समाविष्ट केलेले आहे. या गूढार्थबोधिनीटीकेच्या माध्यमातून पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भगवान श्रीमहाकालभैरवांच्या आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक स्वरूपांवर विशेष प्रकाश टाकलेला आहे.

अधिक वाचा
Rahasyarthaprakash – Mahabhashya (Part 3)

त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 3

त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.

अधिक वाचा
Rahasyarthaprakash – Mahabhashya (Part 2)

त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 2

त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.

अधिक वाचा
Rahasyarthaprakash – Mahabhashya (Part 1)

त्रिपुरारहस्य - ज्ञानखंड रहस्यार्थप्रकाश भाग 1

त्रिपुरारहस्य हा ग्रंथ भगवान श्रीदत्तात्रेय आणि त्यांचे शिष्योत्तम भगवान श्रीभार्गव जामदग्न्य परशुराम यांच्यामध्ये झालेल्या अध्यात्मिक संवादावर आधारलेला आहे. या ग्रंथाच्या ज्ञानखंडावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी सलग पंधरा वर्षे प्रवचने दिली. या प्रवचनांना संकलित करून त्यातील काही प्रवचने या 'रहस्यार्थप्रकाश- महाभाष्य’ या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवान श्रीदत्तात्रेय शिष्यभाव धारण केलेल्या भार्गव परशुरामांना चितशक्ती श्रीविद्येच्या निर्गुण आणि सगुण अर्थात परसूक्ष्म आणि स्थूल स्वरुपांवर प्रकाश टाकणारा उपदेश करण्यास प्रारंभ करतात. उपदेशक्रम चालू असताना मधून मधून भगवान श्रीभार्गव परशुराम विनम्र जिज्ञासेने प्रश्न करतात आणि भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागतात असा वरील दोनही सुश्रेष्ठ अवतारी महात्म्यांमध्ये झालेल्या प्रश्नोत्तरांमधून जो संवादक्रम प्रगट झाला तोच हा त्रिपुरारहस्य ग्रंथ होय.

अधिक वाचा
Dashangamahabhaktiyoga

दशांगमहाभक्तियोग

दशांगमहाभक्तियोग प्रकाशन तारीख 2018-07-27 भाषा मराठी एकूण पाने 168 भक्तिसाधनेच्या विविध अंगावर प्रकाश टाकणारा श्रीगुरुदेव श्रीनिवासजी यांचा 'दशांगमहाभक्तियोग' हा ग्रंथ आहे. निष्ठा, आचार, सेवा, चरित्र, ध्यान, राग, अनुराग, अतिराग, औदासिन्य आणि प्रेमहर्ष या भक्तिच्या दहा विविध अंगाचे महत्त्व प्रस्तुत ग्रंथाद्वारे श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी प्रकट केले आहे. श्री ज्ञानदेवांच्या श्रीहरिपाठ या रचनेमध्ये त्यांनी 'दशकांचा मेळा' या शब्दांद्वारे दशांगमहाभक्तिचा केवळ सूतोवाच केला. त्या सूतोवाचावर श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी भक्तिच्या दहा अंगांचा सविस्तर आणि सखोल उलगडा 'दशांगमहाभक्तियोग' या महाग्रंथामधून केला आहे.

अधिक वाचा
Shri Ganesharchana Deepika

श्रीगणेशार्चनदीपिका

श्रीमहागणपती सहस्त्रनामातील एकशे आठ नामांचा केवळ शब्दार्थच नव्हे तर त्यांच्या मागील गूढ रहस्यार्थ प्रकट करणारा असा श्रीगुरुदेव श्रीनिवासजी रचित श्रीगणेशार्चनदीपिका हा ग्रंथ आहे. आपल्या उपास्य देवतेच्या नामांच्या अर्थाचे अनुसंधान करणे हा त्या देवतेच्या उपासनेचे एक महत्त्वाचे अंग आहे. नामार्थाचे अनुसंधान हा जसा स्वाध्याय आहे तसेच आपल्या उपास्यरूप परमेश्वराचे प्रणिधान म्हणजे ध्यानही आहे. दिव्य, चिन्मय सगुण साकार स्वरुपात अवतरलेल्या परमेश्वराच्या प्रत्येक विग्रहांची पाच वैभवशाली अथवा ऐश्वर्यशाली अंगे असतात. उपास्य देवतेचे नाम, रूप, गुण, लीला आणि धाम हीच ती प्रत्येक देवतेची पाच ऐश्वर्यशाली अंगे होत की ज्यांना उपासना शास्त्रामध्ये 'पंचविभव' अशी संज्ञा आहे. प्रत्येक उपासकांनी आपल्या उपास्य देवतेचे प्रणिधान अथवा ध्यान करताना तिच्या वर उल्लेखिलेल्या पंचविभवांवर आपले चित्त केंद्रीत करावयाचे असते. नेमके हेच श्री गुरुदेवांनी या ग्रंथामधून सविस्तररित्या स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा
Shrimad Bhagavad Geeta Sudhaasaar

श्रीमद्भगवद्गीतासुधासार

श्रीमद्भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे भवरोगाने ग्रस्त झालेल्या जीवाला अनंत दिव्यजीवन प्रदान करणारे दिव्य अमृतच आहे. अशा या दिव्यामृतस्वरूप गीतोपदेशाला आपल्या चिंतनाचा विषय बनवून त्या समस्त गीतोपदेशरुपी सुधेचे सारच श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी श्रीमद्भगवद्गीतासुधासार ह्या ग्रंथातून सांगितले आहे. पहिल्या अध्याया पासून उपदेशात्मक विचारांचा ओघ आणि त्यांची दिशा कशी वाहत जाते आणि अठराव्या अध्यायात ते उपदेशात्मक विचार कसे पूर्णत्वास जातात याचे अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत, काही ठिकाणी प्रासंगिक उदाहरणे देऊन विवेचन केलेले आहे.

अधिक वाचा